A few words

About Us

History

Our story is story of people

बारटक्के फाऊंडेशन जनसेवेचा वसा

जनसेवेचा वसा ‘बारटक्के फाऊंडेशन’
दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी जपलेला समाजसेवेचा वसा समर्पित संस्कारांनी साकार झालेला आहे. तब्बल ४२ वर्षे दिलीप बारटक्के यांनी जनसेवेचा वसा घेतलेला आहे. तो अविरत. अथक, स्पृहणीय आहे. म्हणूनच समाजाला आदर्शवत व प्रेरणादायी झाला आहे.दिलीप बारटक्के आपला माणूस, जिव्हाळ्याचा माणूस आणि कुटुंबातला माणूस म्हणून त्यांना सर्वजण ओळखतात .
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद , धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे मार्गदर्शन…आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सोबत आणि त्यांचा पाठीबां अशा तालमीत तयार झालेल्या या अस्सल शिवसैनिकाने आत्मविश्वासाच्या बळावर समाजसेवेचे उत्तुंग शिखर गाठले 
समाजकल्याणाच्या विचारांची शक्ती, आत्मनिर्धाराचा बाणा, समर्पणवृत्ती आणि सतत देता हात यांमुळे बारटक्केसाहेब यांच्या यशोगाथेचा ग्रंथ संपन्न झालेला आहे. समाजसेवेचा प्रवास दिसतो तेवढा सोपा नसतो. त्यासाठी सातत्य, धाडस कार्यावर निष्ठा समाजाबद्दलची कळकळ लागते.हे सर्व गुण त्यांच्या मध्ये आहेत बारटक्के साहेबांनी सामाजिक कार्याला साधा शिवसैनिक म्हणून सुरवात केली  त्यांच्यातला धाडसी शिवसैनिक उच्च आचार-विचार आणि कृतीने अल्पावधीतच लोकप्रिय झाले . शिवसैनिक, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख,ठाणे महापालिकेत ३ वेळा नगरसेवक, सांस्कृतिक समितीचे सभापती, ठाणे महापालिका शिवसेना गटनेता असा हा चढत्या भाजणीचा यशाचा प्रवास आहे. समृद्ध,आनंदी आणि निरोगी समाज हाच त्यांचा ध्यास आहे.
समाज सेवेसाठी सतत सामाजिक उपक्रमांची आखणी करत यशस्वीरित्या राबवित असतात. त्यांच्या सोबत सळसळत्या उत्साहाचे सशक्त समाजाची स्वप्न पाहणारे तरुण, ज्येष्ठ नागरिक, तन, मन, धन देणारे हितचिंतक ,शिक्षण, वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे निष्ठावंत सोबत आहेत. असे  अनेक प्रकारचे सुहृद त्यांच्या भेटीला येत असतात. तसेच आधाराची गरज असणारे निराधार, समस्यांची पूर्ती व्हावी म्हणून आलेले नागरिक  असतात… प्रत्येकाच्या समस्या सोडविणे, सहकार्य करणे, मदतीचा हात देणे हे बारटक्के साहेबांचं नित्याचं जीवन आहे. या स्वभावामुळे त्यांनी अशी अगणित माणसं जोडली आहेत. 
दिलीप चंद्रकांत बारटक्के व्यक्तीचा आता एक मोठा सामाजिक परिवाराचा परीघ  बनला आहे. जनसेवेचा हा वसा यापुढेही कायम असावा . त्यासाठी उद्योग व समाजसेवेचे  माध्यम म्हणून ‘बारटक्के फाऊंडेशन’ची स्थापना हे  निमित्त आहे.बारटक्के फाऊंडेशनच्या माध्यमातून तरुणांसाठी महारोजगार मेळावा चळवळ  नव्या उत्साहानं, पुढे जात आहे. रोजगार चळवळ अशीच सुरु राहणार आहे ज्येष्ठापासून सर्व  समाजातील सर्व स्तरासाठी पुरुष महिला वयोगटासाठी, सर्वांना उपयुक्त असे सामाजिक, आर्थिक आरोग्यविषयक सांस्कृतिक उपक्रम आखले जाणार आहेत.
यात सहभागी होण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन ‘बारटक्के फाऊंडेशन’ तर्फे करण्यात येत आहे.
संपर्क :9920801212
Email: bartakkefoundation@gmail.com
Website:www.bartakkefoundation.com
Come work with us

If you would like to work for an organisation making a real impact in society.. come join us

Want to make a difference?

Help us raise money for our humanitarian causes